

लंडन : ब्रिटनमधील स्टॉकटन शहरात एक व्यक्ती विकत घेतलेले नवे घर साफ करत असताना त्याला एक गुप्त दरवाजा दिसला. 56 वर्षीय जेफ हायफिल्ड यांनी नुकतेच घर विकत घेतले होते. त्याला या जागेला आपले आलिशान ऑफिस बनवायचे होते. त्यासाठी साफसफाई केली जात होती. याचवेळी त्याला एक गुप्त दरवाजा आढळला आणि आत प्रवेश करताच एक भुयार दिसले ते अनेक दिशांनी जात होते. त्याच्या आत 5 फूट उंचीची छोटी घरे बांधण्यात आली होती. ही घरे लाकडी खिडक्या, भक्कम दारे, कपाट आणि अगदी मेणबत्त्या ठेवण्याची जागा अशी बनवली होती. हे सैन्याचे बॅरेक्स असल्यासारखे दिसत होते. जेफने धैर्य एकवटले. तो आत गेला आणि त्याने जे पाहिले ते पाहून त्याला आश्चर्य वाटले.
जेफ स्थानिक इतिहासकारांशी याबद्दल बोलले, तेव्हा त्यांना कळले की, हे भुयार 250 वर्षे जुने आहे आणि संपूर्ण इंग्लंडमध्ये बांधलेल्या बोगद्याच्या नेटवर्कचा एक छोटासा भाग आहेत. ते उंच रस्त्यावरून एका नदीकडे जातात. काही लोक म्हणतात की, जुने श्रीमंत लोक फिरण्यासाठी या रस्त्यांचा वापर करत. तस्करीसाठी त्यांचा वापर होत असल्याचा दावाही केला जात आहे. कारण बोगद्यांचा मार्ग नदीच्या दिशेने जातो आणि नदीतून बाहेर येतो. सर्व भुयारे सुमारे साडेपाच फूट रुंद असतील. 200 वर्षांपूर्वी लोक इतके लहान होते.