

पुढारी ऑनलाईन डेस्क : जसजशी होळी जवळ येत आहे, तसतसे सोशल मीडिया स्टारमध्ये नवनवीन कन्टेन्ट देण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. कोण कसा व्हिडिओ बनवेल याचे काही सांगता येत नाही. दिल्लीच्या मेट्रोमधील एका व्हिडिओवरुन याची प्रचिती येते. ही व्हिडिओ आहे दोन तरुणींची. त्या दोघींच्या हालचाली आणि हावभाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. युजर्सनी तर कमेंट करत रणवीर दिपीकाच्या रामलीला मधील 'ती' रासलीला अशा कमेंट केलेल्या आहेत. तर काहींनी या दोन तरुणींच्या असल्या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. Delhi Metro Viral VIdeo
होळीला सोशल मीडियावर रील आणि व्हिडिओंचा पाऊस पडत असतो. अनेक क्रिएटर्स यावेळी भन्नाट कल्पना लढवून कायतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमधील दोन तरुणींनी फारच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नामुळे दोघीही तरूणी ट्रेंडींगवर आल्या आहेत. हा व्हिडिओ आहे दिल्लीच्या मेट्रो ट्रेन मधील. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. Delhi Metro Viral VIdeo
दिल्लीच्या मेट्रो ट्रेनमधील या व्हिडिओत दोन तरुणी प्रवास करत आहेत. यावेळी सर्व प्रवास आपआपल्या सीटवर बसले असताना या दोघींची अचानकपणे व्हिडिओ बनवण्याची लगबग सुरु होते. कॅमेरामन दोघींची व्हिडिओ करण्यास सुरु करतो. आणि त्यानंतर रंगपंचमी साजरी करतानाटे या दोघींचे विचित्र हावभाव व्हिडिओत पहायला मिळतात. दोघींपैकी एकीने पांढरी सा़डी तर एकीने कुर्ता घातलेला आहे. दोघींचे कपडे हे रंगपचमीच्या रंगाने भरलेले आहेत. कुर्ता घातलेल्या तरुणीने तर ड्रेसवरच रंग ठेवलेला आहे. दोघीही मेट्रोच्या डब्यात खाली बसून रोमँटिक अंदाजात रंगपंचमी साजरी करु लागतात.