MLA Ratnakar Gutte : रासप आमदार गुट्टे यांची 255 कोटींची मालमत्ता ‘ईडी’ने घेतली ताब्यात

MLA Ratnakar Gutte : रासप आमदार गुट्टे यांची 255 कोटींची मालमत्ता ‘ईडी’ने घेतली ताब्यात
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांची 255 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतली आहे. 'ईडी'ने डिसेंबर 2020 मध्ये या मालमत्तांवर टाच आणली होती. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडत न्यायालयीन परवानगीनंतर 'ईडी'ने ही कारवाई केली आहे. (MLA Ratnakar Gutte)

'ईडी'ने 635 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात आमदार गुट्टे यांच्यावर मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. कंपन्यांच्या विरोधात गरीब शेतकर्‍यांच्या नावाने कृषी कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा आरोप आहे.

बँकांकडून घेतलेली कर्जे 2012 ते 13 आणि 2016 ते 17 यादरम्यान होती. ही कर्जे इतरत्र वळती करण्यात आली. तसेच ज्या शेतकर्‍यांच्या नावाने कर्ज काढले होते, त्यांना कर्जाची रक्कम मिळाली नाही, असा आरोप आहे. (MLA Ratnakar Gutte)

हा आरोप तपास खरा ठरल्यानंतर 'ईडी'ने कारवाई करत गुट्टे यांच्याशी संबंधित गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड (जीएसईएल) साखर कारखाना आणि यंत्रसामग्री; शिवाय योगेश्वरी हॅचरिज आणि गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेड या तीन संलग्न कंपन्यांची सुमारे 5 कोटी रुपयांची जमीन, बँकांमधील सुमारे दीड कोटींची गुंतवणूक तसेच गंगाखेड शुगर्सचे 1 कोटींहून अधिक रुपयांचे समभाग अशी परभणी, बीड आणि धुळ्यातील 255 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली होती. आता 'ईडी'ने ही मालमत्ता ताब्यात घेतल्याने गुट्टे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news