Marathwada Gram Panchayat Election Result Update : गेल्या दहा वर्षापासून सत्ताधारी गटाने गावाच्या विकासासाठी दाखवलेली अनास्था यामुळे मतदारांमध्ये नाराजी होती. त्याशिवाय संत भगवानसिंग महाराज ग्रामविकास पॅनेलने सर्वसामान्य माणसाला विश्वासात घेऊन गावाच्या विकासासाठी केलेला आराखडा गावातील रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणी, विज यावर भर देऊन गावचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याचे केलेले सादरीकरण त्यामुळे सुरुवातीपासूनच ही निवडणूक एकतर्फी झाली होती. त्यामुळे तेजाबाई मिटकर या विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या.