Latest
मराठा क्रांती मोर्चा समन्वकांचा मंत्रालयात ठिय्या
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी राज्य सरकारने संभाजीराजे यांनी मांडलेल्या मागण्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या पूर्ण केल्या नसल्याचा आरोप करून सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या दालनात मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी ठिय्या दिला आहे.
भांगे हे मागण्या पूर्ण करण्यासाठी समन्वय अधिकारी होते, मागण्या मान्य होत नाही तोवर दालनातून उठणार नाही, असा इशारा मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात

