

मुंबई: पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले मनोज सौनिक यांची आता मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री कार्यालयात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'प्रधान सल्लागार' म्हणून काम करणार आहेत. सौनिक यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. Manoj Saunik
मनोज सौनिक हे डिसेंबर २०२३ मध्ये मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले. मुख्य सचिव म्हणून ३० एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२३ या कार्यकाळात त्यांनी जबाबदारी सांभाळली. निवृत्तीनंतरही ते मुख्य सचिव पदी राहावे, यासाठी राज्य सरकारने त्यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली होती. मात्र, त्यावर केंद्र सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे सौनिक यांना सेवेतून निवृत्त व्हावे लागले. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर मेहरनजर दाखवत त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी लावली आहे. मुख्यमंत्र्यांचे ते प्रधान सल्लागार म्हणून ते यापुढे काम करणार आहेत. Manoj Saunik
हेही वाचा