शनिवारी दुपारी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी व्हिडिओ संदेशात केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवला. त्यात केजरीवाल म्हणाले की, मी आतापर्यंत खूप संघर्ष केला आहे, भविष्यात माझ्या आयुष्यातही मोठे संघर्ष लिहिले आहेत. माझ्या अटकेमुळे भाजपचा द्वेष करू नका, असे आवाहन त्यांनी आप कार्यकर्त्यांना आहे. केजरीवाल यांचा संदेश त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी वाचून दाखवल्यानंतर त्या मुख्यमंत्री होतील, अशाही चर्चा सुरू आहेत.