दूध दरवाढ : अमुलनंतर मदर डेअरीनेही दूधाचे वाढवले दर; सर्व सामान्यांना बसणार झटका

file photo
file photo

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर दिल्लीतील लोकांना महागाईला समोर जाव लागत आहे. एलपीजी गॅस सिलेंडर चे दर वाढले आहेत. आता दूध दरवाढीला समोर जाव लागणार आहे. सद्या सीएनजी, पेट्रोल, डिझेल, खाद्य तेलापर्यंत सगळे महागले आहे. याचा झटका सामान्य जनतेला बसत आहे. शनिवारी दिल्ली आणि एनसीआर च्या जनतेला मदर डेअरीनेही धक्का दिला आहे. मदर डेअरीनेही दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

११ जुलै पासून मदर डेअरीचे दूध २ रुपये प्रतिलीटर महागणार आहे. याअगोदर दीड वर्षांपूर्वी मदर डेअरीने किंमती वाढविल्या होत्या.
या महिन्याच्या एक तारखेपासून अमुलनेही दूधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ केली होती. पॅकेजिंग खर्चात ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे, वाहतुकीच्या किंमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे, अस अमुलने निवेदनात म्हटल आहे. चीज, लोणी, तूप, लस्सी, आइस्क्रीम आणि ताक याशिवाय चहा, कॉफी, मिठाई आणि चॉकलेटच्या किंमतीही वाढू शकतात.

या अगोदर २०१९ मध्ये मदर डेअरीने दुधाच्या किंमती वाढवल्या होत्या. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बदललेल्या किंमती रविवारी ११ जुलैपासून लागू होतील. या किंमती दुधाच्या सर्व प्रकारांवर लागू होतील.

मदर डेअरीच्या निवेदनात म्हटले की, "कंपनीच्या इनपुट कॉस्टवर महागाईचा बोजा वाढत आहे, जो गेल्या एका वर्षात अनेक पटींनी वाढला आहे. त्यानंतर सध्याच्या साथीच्या काळात दुधाचे उत्पादन कमी झाल्यानेही भर पडली आहे."

गोकुळ दूध संघानेही केली दरवाढ

गोकुळच्या दूध उत्पादकांना दरवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हशीच्या दूधाला २ रुपये व गायीच्या दूधाला १ रुपये दरवाढ देण्यात आली आहे. ही दरवाढ ११ जुलै पासून लागू होणार आहे. अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या दरवाढीचा फरक २१, २२, तारखेला बिलामध्ये देण्यात येणार आहे. अमुलने विक्रीमध्ये दरवाढ केली आहे. गोकुळही विक्रीमध्ये दरवाढ करणार आहे. गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादकांना कसा फायदा होईल याकडे आमच लक्ष असणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

एकीकडे दुध उत्पादकांना दरवाढ देण्यात आली, असली कोल्हापूर जिल्हा वगळून विक्री दरातही वाढ करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा वगळून इतर ठिकाणी दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. भूमिहीन शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून २ म्हशी घेण्यापर्यंत विनातारण कर्ज देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. २० लाख लिटर दुध संकलनाचा संकल्प केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

८० म्हैशींचा सांभाळ करत ती करतेय M.sc चा अभ्यास

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news