संतोष तुळशीदास देव्हारे (वय ३५) असे मृताचे नाव आहे. वसंता दुधे याच्याकडून २२ नोव्हेंबर २०२२ मध्ये तुळशीराम देव्हारे यांनी शेतं विकत घेतले. शेतीचा व्यवहार ठरल्याप्रमाणे झाला. दोन दिवसापूर्वी तुळशीराम देव्हारे शेतावर पीक कर्ज घेण्यासाठी बँकेत पोहोचले. तेथे या शेतावर पूर्वीच ७० हजार ५०० रुपयाचा बोझा असल्याचे सांगण्यात आले. ही बाब तुळशीराम यांनी त्यांचा मोठा मुलगा संतोष याला सांगितली. शेत विकणाऱ्या वसंत दुधे याने आपल्यासोबत फसवणूक केली, अशी भवना निर्माण झाली. याचीच विचारणा करण्यासाठी संतोष हा वसंता दुधे याच्या घरी गेला. तेथे त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. वसंता दत्तात्रय दुधे याने धारदार शस्त्राने हल्ला केला व संतोषला जागीच ठार केले. गावात खून झाल्याची वार्ता पसरली. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली. लाडखेड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. दत्ता तुळशीराम देव्हारे याने वसंत दुधे याच्याविरोधात तक्रार दिली. लाडखेड ठाणेदार स्वप्निल निराळे, जमादार विनोद वानखडे यांच्यासह पोलिस पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी दारव्हा येथे पाठविला. अधिक तपास ठाणेदार स्वप्निल निराळे करीत आहेत.