Yavatmal drowning Case : खदाणीच्या खड्ड्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू

मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील घटना
Yavatmal drown incident
खदाणीच्या खड्ड्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू
Published on
Updated on

यवतमाळ : कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मारेगाव तालुक्यातील कुंभा महसूल मंडळात येत असलेल्या नरसाळा येथे रविवारी (दि.१८) ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बेबीबाई तुळशीराम राजगडकर (वय ६५) या रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गावातील सरकारी गिट्टी खदान परिसरातील पाण्याच्या खड्ड्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. बराच वेळ होऊनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पाय घसरून त्या पाण्यात पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. शोध घेत असताना त्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तत्काळ बाहेर काढून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृत महिलेच्या पश्‍चात पती, दोन मुलं, सुना व नातवंड असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news