Umarkhed Owl Rescued | ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या घुबडाला जीवदान

बिटरगाव शिवारात वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाच्या तत्परतेने मुक्या जीवाचे प्राण वाचले
Owl Rescued From Well In Umarkhed
Owl Rescued From Well In UmarkhedPudhari
Published on: 
Updated on: 

Owl Rescued From Well In Umarkhed

उमरखेड : बिटरगाव शिवारातील एका शेतातील सुमारे ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या घुबडाला वनविभाग आणि पशुवैद्यकीय विभागाच्या तत्परतेने सुरक्षित बाहेर काढून जीवदान देण्यात आले. विहिरीत पडल्याने घुबड जखमी व घाबरलेल्या अवस्थेत होते. वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केले.

बिटरगाव शिवारातील शेतातील विहिरीत घुबड पडल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुदर्शन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यादरम्यान शेतकरी आशिष तिवारी यांनी धाडस दाखवत विहिरीत उतरून घुबडाला सुरक्षितपणे बाहेर काढले.

Owl Rescued From Well In Umarkhed
Yavatmal Accident : काळाचा घाला! माजी सरपंच पती-पत्नी भीषण अपघातात ठार

विहिरीत पडल्यामुळे घुबडाच्या शरीराला दुखापत झाली होती. त्याची अवस्था लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने ढाणकी येथील पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधला. पशुवैद्यकीय अधिकारी पांडू भिकू राठोड यांनी घुबडाची तपासणी करून आवश्यक उपचार केले. उपचारानंतर घुबडाची प्रकृती स्थिर झाल्याचे सांगण्यात आले.

या बचावकार्यात वनपरिक्षेत्र अधिकारी सुदर्शन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक एस. जी. सलामे, डी. एन. सरकाळे, वनरक्षक बी. बी. ढेंबरे, वाहनचालक राजू राठोड, वनमजूर गजू देवकते व सुरेश मेंडके यांनी सहभाग घेतला. वनविभाग आणि पशुवैद्यकीय विभागाच्या समन्वयातून तसेच शेतकऱ्याच्या धाडसामुळे एका मुक्या जीवाचे प्राण वाचले. या तत्परतेबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.