Yavatmal News | शेतात पाणी देण्यास गेलेल्या युवा शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू

उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथील घटना
Yavatmal News | शेतात पाणी देण्यास गेलेल्या युवा शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू
Yavatmal News | शेतात पाणी देण्यास गेलेल्या युवा शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यूPudhari
Published on
Updated on

यवतमाळ : नेहमीप्रमाणे रात्री दहाच्या सुमारास पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेला युवा शेतकरी सकाळपर्यंत घरी पोहोचला नाही. शेतातच त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. ही खळबळजनक घटना उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथे शनिवारी उघडकीस आली.

सावळेश्वर येथील पंकज प्रभू शिंदे (वय २५)  असे मृत शेतकरी तरुणाचे नाव आहे. वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी उचलणाऱ्या तरुण शेतकऱ्याने भाजीपाला उत्पादन सुरू केले होते. १३ मार्चला रात्री आपल्या शेतातील संभार पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. मात्र, सकाळी पंकज घरी न पोहोचल्याने आईने शोधाशोध सुरू केली.

दरम्यान गावातील काहींनी शेतात जाऊन पाहिले असता, शनिवारी १४ मार्चला सकाळी संभार पिकातच त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विधवा आईच्या मदतीसाठी भाजीपाला उत्पादन करून तो स्वतः विकण्यापर्यंत धावपळ करणाऱ्या तरुण पंकजचा दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार रोशन सरनाईक करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news