Yavatmal Drowning Incident|'एमबीबीएस'च्या २२ वर्षीय विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी अंत

दारव्हा येथील चिंतामणी मंदिराजवळील घटना
Drowning news
Drowning newsPudhari
Published on: 
Updated on: 

यवतमाळ : एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या एका युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि.९) दुपारी तीनच्या सुमारास दारव्हा तालुक्यातील चिंतामणी मंदिराजवळील शेतात घडली.जय संजय निमकर (वय २२) असे मृत तरूणाचे नाव आहे.

जय हा चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त तो गावी आला होता. सोमवारी काही मित्रांसोबत फिरायला गेला असता त्याला शेततळ्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. तळ्यात उतरल्यानंतर गाळात फसल्याने तो पाण्यात बुडायला लागला, त्यावेळी मित्रांनी आरडाओरडा केला. त्यानंतर अनेकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्याला बाहेर काढले. परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मावळली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.