विश्वासाला तडा! नोकरानेच फोडले मद्यविक्रीचे दुकान; ६० हजारांचा मुद्देमाल लंपास

पोलिसांनी नोकर आणि त्याच्या मित्र या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

यवतमाळ : दिग्रस येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेले मद्यविक्रीचे दुकान फोडून दोन चोरट्यांनी रोख रक्कम, दारू असा ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली.

याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.विजय जुगल जयस्वाल, (वय ४५), राजू जुगल जयस्वाल (वय ४०) दोघेही रा. देवनगर, दिग्रस अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दिग्रस येथे  संतोष जयस्वाल व अनिल जयस्वाल यांचे वाइन शॉप आहे. त्यांच्या दुकानात विजय जयस्वाल हा नोकर होता. संतोष जयस्वाल हे दुकानात हजर असताना त्यांना मित्राचा फोन आला. त्यामुळे ते दुकानातून बाहेर गेले. यावेळी नोकर विजय एकटाच दुकानात होता.

संतोष हे दुकानात परत आल्यानंतर त्यांना गल्ल्यातील रोख रक्कम चोरी गेल्याची शंका आली. त्यांनी नोकराकडे विचारणा केली असता, त्याने माहीत नाही, असे उत्तर दिले. सीसीटीव्ही तपासले असता नोकर विजय हा राजू जयस्वालसह दुकानातील दारू बाटल्या, गल्ल्यातील रोकड चोरी करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून संतोष जयस्वाल यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश लाखकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news