माजी सरपंच संतोष दरने यांनी २८ मार्च, २०२२ पासून आठ दिवस ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणही केले होते. तत्कालीन सरपंच व ग्रामसेविकेने हुडी (बु.) ग्रामपंचायतमध्ये सन २०१८-२०१९ मध्ये दलित वस्ती, तंटामुक्त मुक्त गाव, पाणीपुरवठा निधी, स्वच्छ भारत मिशन या योजनांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे काही पुरावे आहेत. तत्कालीन ग्रामसेविका व सरपंचासह सदस्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी सरपंच संतोष धरणे यांनी तक्रारीत केली होती. सरपंच व ग्रामसेविकेने १४ लाख ९१ हजार २३८ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे चौकशीत आढळल्याने, दोघींनाही ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू व बीट जमादार इंदल आडे यांनी अटक केली. सरपंचासह ग्रामसेविकेवर कारवाई केल्याने तालुक्यातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.