Yavatmal house burglary: यवतमाळ शहरात धाडसी घरफोडी; पाच लाखांचे दागिने लंपास

शहरातील पांढरकवडा मार्गावरील हसनेन कॉलनीत बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली
Jewellery Theft
Jewellery TheftPudhari
Published on
Updated on

यवतमाळ : शहरातील पांढरकवडा मार्गावरील हसनेन कॉलनीत बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १७) रात्रीच्या सुमारास घडली.

या प्रकरणी अब्दुल अहद गाझी यांनी शनिवारी (ता. १८) अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल अहद गाझी हे इंदिरा गांधी मार्केटमध्ये फुटवेअरचे दुकान चालवतात. शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजता ते आणि त्यांची आई दुकानासाठी घराबाहेर गेले होते. रात्री सुमारे दहा वाजता ते परत घरी आले असता, घराचे कुलूप तुटलेले आढळले आणि घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.

अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news