यवतमाळ : भीषण अपघातात बापलेकीचा मृत्यू, भाची गंभीर

Road accident: पांढरकवडा तालुक्यातील मारेगाव ते केळापूर मार्गावर घडला अपघात
Yavatmal road accident
यवतमाळ : भीषण अपघातात बापलेकीचा मृत्यू, भाची गंभीरFile photo
Published on
Updated on

यवतमाळ : भरधाव आयशरची दुचाकीला धडक लागून झालेल्या भीषण अपघातात बापलेकीचा मृत्यू झाला, तर भाची गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना मंगळवारी पांढरकवडा तालुक्यातील मारेगाव (वन) ते केळापूर मार्गावर घडली.

रामदास जलपत धुर्वे (वय ५०), तृप्ती रामदास धुर्वे (वय २४) अशी मृतांची नावे आहेत, तर या अपघातात वैष्णवी विलास पेंदोर (२३) ही गंभीर जखमी झाली. तिला सर्वप्रथम यवतमाळ व तेथून नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वैष्णवी ही रामदासची चुलत बहीण वंदना पेंदोर हिची मुलगी आहे. तिचे लग्न जुळल्याने ती केळवणासाठी सोमवारी (दि. ७) एप्रिलला सायखेडा येथे रामदास धुर्वे यांच्याकडे आली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी दुपारी १२ वाजता वैष्णवीला तिच्या गावी झरी तालुक्यातील कारेगाव (पारोंबा) येथे पोहोचवून देण्यासाठी रामदास व त्यांची मुलगी तृप्ती वैष्णवीला घेऊन दुचाकीने निघाले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मारेगाव (वन) ते केळापूर मार्गावर एका आयशर वाहनाने रामदासच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन रामदासचा जागीच मृत्यू झाला, तर तृप्ती आणि वैष्णवी या दोघी गंभीर जखमी झाल्या.

अपघातानंतर त्यांना तातडीने यवतमाळ येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तृप्तीचा मृत्यू झाला, तर प्रकृती गंभीर असलेल्या वैष्णवीला नागपूर येथे हलविण्यात आले. या घटनेनंतर मृत रामदासचे काका मारोती गोदराजी धुर्वे यांनी या प्रकरणी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीवरून अज्ञात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news