Yavatmal Crime : एक कोटीच्या दरोड्यातील तीन आरोपींना पुण्यातून अटक

पोलीस चौकशीत आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
Yavatmal Crime
Published on
Updated on

यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथील राजेंद्र वर्मा यांचे ज्वेलर्सचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना १५ जुलै रोजी घडली होती. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केली असून, त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेले वाहन पुणे येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी विशाल रघु कुंभार (वय २५, रा. चाकण) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने इतर आरोपींची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौशी ऊर्फ सिरी राजकुमार राठोड (वय २४, रा. शिक्रापूर) आणि अभिमन्यू राठोड (वय ३८, रा. डाळिंब, जि. पुणे) यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी ठाण्यात आणले.

पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि चारचाकी वाहन असा एकूण ६० लाख १० हजार ३०२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार लहू तावरे, सायबरच्या यशोधरा मुनेश्वर, शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर, एपीआय दत्ता पेंडकर, धीरज बांडे, धनराज हाके, सागर इंगळे, शिवशंकर कायंदे, अमोल राठोड, नितीन सुशीर, शरद लोहकरे आदींच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news