Yavatmal crime | पोलिसाच्या घरीच चोरट्यांनी केला हात साफ

बंद घराला चोरट्यांनी केले लक्ष्य, संबधित पोलिस सीआयडी शाखेत
Yavatmal crime |  पोलिसाच्या घरीच चोरट्यांनी केला हात साफ t Case
Yavatmal crime | पोलिसाच्या घरीच चोरट्यांनी केला हात साफ Pudhari
Published on
Updated on

यवतमाळ  : नागपूर येथे ‘सीआयडी’ शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या बंद घरावर चोरट्यांनी हातसाफ केला. पोर्चमधून चोरट्यांनी दोन कुलर आणि पाण्याची मोटर लंपास केली. शहरातील पिंपळगाव मार्गावरील बालाजी पार्कमध्ये रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

बालाजी पार्क परिसरात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण रंदई यांचे स्वतःचे घर आहे. रंदई हे सध्या सीआयडी, नागपूर शहर येथे कार्यरत आहेत. येथील त्यांच्या घरात कुणीही राहत नसल्याने घर बंद आहे. घरातील काही साहित्य आणि घरगुती वापराच्या वस्तू बाहेर पोर्चमध्ये ठेवलेल्या होत्या. याचाच फायदा घेत अनोळखी चोरट्यांनी पोर्चमधून दोन कुलर आणि पाण्याची मोटर लंपास केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रंदई हे रविवारी  सकाळी  घरी आले असता, त्यांना पोर्चमधील साहित्य गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आजूबाजूला चौकशी केली. मात्र, काहीही सुगावा लागला नाही. त्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून चोरीबाबत तक्रार दिली. पोलिस अधिकार्‍याचेच घर सुरक्षित नसल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news