Yavatmal Crime : यवतमाळ हादरले! दारूसाठी पैसे नाकारल्याने मुलाकडून बापाचा खून; आरोपी जेरबंद

Crime News
Crime News
Published on: 
Updated on: 

यवतमाळ : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून झालेल्या वादात मुलाने जन्मदात्या वडिलांवर लाकडी दांड्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना घाटंजी तालुक्यातील साखरा येथे बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

शंकर नंदू जाधव (वय ५५, रा. साखरा) असे मृताचे नाव असून, अनिल शंकर जाधव (वय ३५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. दारू पिण्यासाठी अनिलने वडिलांकडे पैशांची मागणी केली होती. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात अनिलने लाकडी दांड्याने वडिलांवर सपासप वार केले. या हल्ल्यात शंकर जाधव गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर शंकर जाधव यांना त्यांच्या मोठ्या मुलाने तातडीने उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी बुधवारी (दि. १३ ऑक्टोबर) विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा अनिल जाधव याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news