Yavatmal Crime | यवतमाळ : समाज प्रबोधनासाठी सायकलवरुन भारतभ्रमण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला लुटले

यवतमाळ-घाटंजी रोडवरील चापडोह घाटातील घटना
Yavatmal Crime
AI generated Image
Published on
Updated on

यवतमाळ : समाज प्रबोधनासाठी सायकलने भारत भ्रमण करणाऱ्या पुणे येथील एका सामाजिक कार्यकर्त्याला रस्त्यात अडवून लुटले. यवतमाळ-घाटंजी रोडवरील चापडोह घाटात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.  

सुशील रामभाऊ बोबडे (वय ५१) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. ते सायकलने भारत भ्रमण करून समाज प्रबोधनाचे काम करतात. रविवारी घाटंजी येथील कार्यक्रम आटोपून सुशील हे सायकलने यवतमाळकडे येत होते. दरम्यान, रात्री ९.३० वाजताच्या सुमारास चापडोह घाटात येताच दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी त्यांना अडवले. पेट्रोल भरण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र, बोबडे यांनी पैसे देण्यास नकार दिला.  त्यानंतर एका आरोपीने त्यांच्या हातातील सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. अंधाराचा फायदा घेत तिघेही दुचाकीवरून पसार झाले. घटनेनंतर बोबडे यांनी पोलिसांना माहिती दिली.  याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसानी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news