Yavatmal Crime |यवतमाळ मध्ये रुग्णालयात शिरून भरदिवसा परिचारिकेचा खून

Yavatmal Crime |यवतमाळ मध्ये रुग्णालयात शिरून भरदिवसा परिचारिकेचा खून
Published on
Updated on

यवतमाळ : रुग्णालयात शिरून परिचारिकेचा खून करण्यात आला. ही घटना आज शनिवारी दुपारी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दत्त चौकात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

कुसूम चांदेकर (वय 45, रा. यवतमाळ), असे मृत महिलेचे नाव आहे. दत्त चौकातील एका रुग्णालयात ती परिचारिका म्हणून कार्यरत होती. शनिवारी दुपारच्या सुमारास सोबतच्या परिचारिकेसोबत तिचा वाद झाला. तेव्हा घटनास्थळावर दुसर्‍या परिचारिकेचा मुलगा आला. त्यांचा वाद सुरू असताना त्याने रागाच्या भरात तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.

गंभीर जखमी झालेली कुसुम रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. घटनेनंतर परिसरात एकच आरडाओरडा झाली. यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, अवधुतवाडी ठाणेदार अजित कदम आणि डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत जिंदमवार यांनी फौजफाट्यासह रुग्णालय गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे. सायंकाळी उशिरा वृत्त लिहिपर्यंत अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. डीबी पथकाचे प्रमुख श्रीकांत जिंदमवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक फरार आरोपीच्या मागावर रवाना झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news