Yavatmal Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून खून करणाऱ्यास जन्मठेप

Yavatmal Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून खून करणाऱ्यास जन्मठेप
file photo
Published on
Updated on

यवतमाळ : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकूने वार करून एकाची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस यवतमाळच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपी श्याम जोगदंड याने २ जून २०२४ रोजी सायंकाळी शहरातील संभाजीनगरात एका तरुणावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या पत्नीने लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी श्याम जोगदंड याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तक्रारदार, तपास अधिकारी यांच्या साक्षी आणि सादर केलेले महत्त्वाचे पुरावे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.

न्यायाधीश ए. एल. यावलकर यांनी आरोपी श्याम जोगदंड याला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. नरेंद्र पांडे यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news