Yavtmal Crime | अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकास अटक: शाळेत करत होता मद्यपानही

घाटंजी पोलिस ठाण्याची कारवाई, गुन्हा नोंद :
 Yavtmal Crime | अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार  करणाऱ्या मुख्याध्यापकास अटक:
Yavtmal Crime | अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकास अटक: Pudhari
Published on
Updated on

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवाघाटंजी तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली.

किशोर मालवीय, असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात  घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन राठोड पुढील तपास करीत आहेत. आरोपी मुख्याध्यापक मालवीय हा शाळेत कार्यरत असतांना दारूच्या नशेत राहून दारूची बाटली सोबत आणत होता.

तसेच शाळेतील एका अल्पवयीन मुलीला पाहून अश्लील हावभाव व चुकीच्या पद्धतीने इशारे करत असल्याचे, तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची तक्रार महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ (महिला व बाल सुरक्षा विशेष कक्ष), उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा रॉबिन बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे दिली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news