Yavatmal News| कुपंणात करंट सोडून व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शेतकर्‍याला तीन वर्षांची शिक्षा

Yavatmal News
Yavatmal NewsFile Photo
Published on
Updated on

यवतमाळ : तारकुंपणात सोडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणातून आरोपी शेतकर्‍याला तीन वर्ष सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एल. यावलकर यांनी शुक्रवारी (ता. 28) सुनावली आहे. 

महादेव खंडू खिरडकर (वय 60, रा. उमरेड, राळेगाव), असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी महादेव खिरडकर यांचे राळेगाव तालुक्यातील उमरेड येथे शेत आहे. शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी त्यांनी तारेचे कुंपण लावून त्यात जिवंत विद्युत प्रवाह सोडला होता. दरम्यान, सहा जुलै 2020 ला मृत सोपान गुलाबराव घरगडे (रा. सावनेर, राळेगाव) आणि इतर दोन मित्र रात्रीच्या वेळी खेकडे पकडण्यासाठी शेतात गेले होते.

अशात तारकुंपणाला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृताचा मुलगा यशवंत घरगडे यांनी वडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महादेव खिरडकर याच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता. या घटनेचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विजय घुले यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले होते.

साक्षपुराव्यानंतर प्रत्यक्ष घटनादर्शी साक्षदार, डॉक्टर, तक्रारकर्ता आणि तपास अधिकारी, इतर साक्षीदारांची साक्ष तसेच उपलब्ध अभिलेखे, पुराव्याच्या आधारावर आरोप सिद्ध झाले होते. त्यावरून न्यायालयाने आरोपी महादेव खिरडकर याला तीन वर्ष सक्षम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे यांनी काम पाहिले. तसेच गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी विजय घुले, सुनीता सिडाम यांनी मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news