Yavatmal Crime | भरदिवसा शेतकर्‍याच्या हातातील दीड लाखांची रक्कम पळविली

पीक कर्जाचे दीड लाख रुपये भरणा करण्यासाठी निघाला होता शेतकरी
Yavatmal Crime
प्रातिनिधिक छायाचित्रfile photo
Published on
Updated on

यवतमाळ : पीक कर्जाचे दीड लाख रुपये भरणा करण्यासाठी आलेल्या शेतकर्‍याच्या यांच्या हातातील दीड लाख रुपयांची रक्कम दोन अनोळखी दुचाकीस्वार हिसकावून पसार झाले. ही घटना आज मंगळवारी दुपारी दीड वाजता दरम्यान आर्णी शहरातील डॉ. नितीन जाधव यांच्या दवाखान्याजवळ घडली. 

आर्णी तालुक्यातील शेतकरी नामदेव गोविंद शिंदे (वय 62) यांनी बँक आँफ इंडिया आर्णी येथून दीड लाख रुपये काढून पिशवीमध्ये ठेवले. त्यानंतर ते सचिव कार्यालयात भरण्यासाठी जात होते. दरम्यान, डॉ. नितीन जाधव यांच्या दवाखान्याजवळ येताच शिंदे यांच्याजवळ दोन चोरटे एका दुचाकीवरून आले आणि काही क्षणात शिंदे यांच्या हातातील पैशाची पिशवी हिसकावून पळून गेले. नामदेव शिंदे यांनी आर्णी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये हेल्मेट घातलेले चोरटे कैद झाले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news