Yavtmal Crime : मारेगाव येथील स्व. चिंधुजी पुरके आश्रमशाळेत विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्‍य?

महिला अधीक्षिका आणि तिच्या पतीविरूध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, मारेगावात खळबळ
Yavtmal Crime
Yavtmal Crimepudhari
Published on: 
Updated on: 

यवतमाळ : मारेगाव येथील स्व. चिंधुजी पुरके प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहात अनधिकृत प्रवेश करून विद्यार्थिनींना मारहाण, गैरवर्तन व धमकाविणार्‍या निलंबित महिला अधीक्षिका आणि तिच्या पतीविरूध्द मारेगाव पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या आश्रमशाळेतील वसतिगृहातच गंभीर प्रकार घडल्याची तक्रार समोर आल्याने मारेगावात खळबळ उडाली आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार गुरुवार दि. 8 ऑक्टोबर रोजी निलंबनाची कारवाई झाल्यानंतर संबंधित अधीक्षिका पतीसह रात्री वसतिगृहात गेल्याचा आरोप आहे.

यावेळी विद्यार्थिनींचे फोटो व व्हिडिओ काढणे, शाळेतील हजेरी रजिस्टर व दस्तऐवज नेणे, मुलींना मारहाण करणे आणि घटनेबाबत कुणाला सांगितल्यास धमकावणे, असे प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी आणि विद्यार्थिनींकडून माहिती घेतल्यानंतर प्रभारी मुख्याध्यापिकेने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रवी बुरकुले करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news