Yavatmal Bribe | यवतमाळ : ५० हजारांची लाच घेताना दोघांना रंगेहात अटक

महसूल सहाय्यक व वरिष्ठ लिपीक जाळ्यात
Buldhana Crime
Bribe CasePudhari
Published on
Updated on

यवतमाळ : भोगवटदार दोनमधून शेतजमीनीचे रूपांतरण एकमध्ये करण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्टेट बँक चौकातील बारमध्ये घडली. 

महसूल सहाय्यक गोपाल मोहाडे व लिपिक राहुल कुयटे अशी अटक केलेल्या लाचखोर कर्मचार्‍यांची नावे आहे. कळंब तालुक्यातील मेंढला शिवारातील शेत खरेदीचे सौदेपत्र तयार करण्यात आले होते. ही शेतजमीन भोगवटदार वर्ग दोनमधून एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाचा पाठपुरावा तक्रारदार करीत होते.  

अशात आरोपी गोपाल मोहाडे यांनी प्रकरण निकाली काढण्यासाठी ७५ हजारांची मागणी करून ती वरिष्ठ लिपिक राहुल कुयटे यांच्याकडे द्यावी, असे सुचविले होते. या प्रकाराला कंटाळून शेतकर्‍याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या पथकाने पाचवेळा पडताळणी केली. आरोपीने तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

दरम्यान, आरोपी राहुल कुयटे याने शुक्रवारी दुपारी लाचेची रक्कम घेऊन स्टेट बँक चौकातील बारमध्ये बोलाविले होते. यावेळी यवतमाळ लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला असता, आरोपी राहुल कुयटे आणि गोपाळ मोहाडे या दोघांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अभय आष्टेकर, पोलिस निरीक्षक अर्जुन घनवट, जयंत ब्राम्हणकर, अब्दुल वसीम, संजय भुजाडे, सचिन भोयर, इफराज काझी, भागवत पाटील, आकाश सहारे, मनीषा राजूरकर, अतुल नागमोते यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news