Yavatmal Accident : रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मारेगाव तालुक्यातील सिंधी गावाजवळील घटना
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

यवतमाळ : काम आटोपून रात्री दुचाकीने परतणार्‍या कामगाराच्या दुचाकीला रानडुकराने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही गुरुवारी (दि.१) रात्री साडेआठच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील सिंधी गावाजवळ घडली. विनोद परसराम जगताप (वय ५०, रा. रामेश्वर) असे मृताचे नाव आहे.

विनोद जगताप हे कुंभा येथे फर्निचरचे काम करून रात्री दुचाकीने आपल्या गावाकडे निघाले होते. सिंधी गावाच्या नाल्याजवळ अचानक रानडुक्कर रस्त्यावर आल्याने त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या धडकेत दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जगताप हे रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडले होते. त्याच मार्गाने जाणार्‍या नागरिकांनी तातडीने त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्रीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हिरावला आहे.

सिंधी परिसरातील रस्त्यावर रानडुकरांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वन्यप्राणी अचानक रस्त्यावर आल्याने अपघात होण्याचा धोका वाढला असून, वन विभागाने या परिसराची पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. मृतकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन वन विभागाने नियमानुसार तातडीने मदत व नुकसानभरपाईची कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news