

यवतमाळ : डुक्कर आडवे आल्याने दुचाकीला अपघात होऊन शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.२१) पहाटे साडेसहा वाजता दारव्हा-दिग्रस मार्गावरील पळशीजवळ घडली. बाळकृष्ण वाळूकर (वय४३, रा. दिग्रस) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
बाळकृष्ण वाळूकर हे गेल्या पाच महिन्यांपूर्वी दारव्हा तालुक्यातील छत्रपती विद्यालय शेलोडी येथे अतिरिक्त शिक्षक म्हणून रुजू झाले होते. ते दररोज दिग्रस ते दारव्हा दुचाकीने ये-जा करीत होते. गुरुवारी (दि.२०) सकाळची शाळा असल्याने ते सकाळी दिग्रसवरून दारव्हा निघाले होते. दारव्हा-दिग्रस मार्गावरील पळशी गावापासून काही अंतरावर ते आले असता त्यांच्या दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने दुचाकीला अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.