

School Headmaster Arrested Bribery Case
यवतमाळ : पदवीधर प्राथमिक शिक्षकाची वैद्यकीय प्रतिकृती देयक लवकर खात्यात जमा करण्यासाठी दीड हजार रुपयाची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ३०) ताब्यात घेतले. गौरीशंकर प्रभाकर सैदाणे (वय ४४) असे लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सैदाणे पुसद तालुक्यातील खैरखेडा येथील शासकिय माध्यमिक आश्रामशाळेत कार्यरत होते. तक्रारदार शिक्षकाने वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक आदिवासी अपर आयुक्त यांच्याकडून मंजुर झाल्यानंतर सदर वैद्यकीय देयक लवकर खात्यात जमा करण्यासाठी मुख्याध्यापक गौरिशंकर सैदाणे यांना वारंवार मागणी केली.
परंतु, त्यांनी संबंधित देयक खात्यात जमा करण्यासाठी टाळाटाळ करीत दीड हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदार शिक्षकाने लाच मागणी केल्याबाबतची तकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीचे अनुषंगाने दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी पडताळणी कार्यवाही दरम्यान मुख्याध्यापक गौरिशंकर सैदाणे यांनी लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले. यावरून मुख्याध्यापकला ताब्यात घेत खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.