Yavatmal Gutkha Seized | गुटख्याची वाहतूक करण्यास अटक: 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

दारव्हा ते नेर रोडवरील कब्रस्तान परिसरात मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
 Gutkha Seized
Gutkha Seized
Published on: 
Updated on: 

Yavatmal Illegal Gutkha Transport

यवतमाळ : गुटख्याची वाहतूक करणार्‍यास दारव्हा ते नेर रोडवरील कब्रस्तान परिसरात मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल सुगंधित तंबाखू तसेच वाहन, असा एकूण 11 लाख दहा हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शेख फैजान शेख अहमद (वय 22, रा. खाटीकपुरा, दारव्हा), असे अटक केलेल्या गुटखा तस्कराचे नाव आहे.

दारव्हा ते नेर रोडने जाणार्‍या एका वाजता लाखोंचा गुटखा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी कब्रस्तान परिसरात सापळा रचला होता.

 Gutkha Seized
Yavatmal Accident : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास दारव्हा मार्ग मालवाहू (क्र. एमएच 29, सीएम - 0204) येताना पोलिसांनी अडविले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित सुपारी, तंबाखू, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.

तब्बल तीन लाख दहा हजार 890 रुपयांचा गुटखा आणि आठ लाखांचे वाहन, असा एकूण 11 लाख दहा हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत शेख फैजान शेख अहमद याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 Gutkha Seized
Yavatmal DCC Bank | यवतमाळ जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा; अध्यक्षपदी खासदार संजय देशमुख

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशंकर कायंदे, कुणाल मुंडोकार, मिथून जाधव, किशोर झेंडेकर, सचिन मलाये, पवन ढवळे, अमित कुमरे आदींनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.