Yavatmal Accident : मालवाहू टिप्परच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

accident
accidentfile photo
Published on
Updated on

यवतमाळ : मालवाहू टिप्परच्या धडकेत. दोन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली. पुसद शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पुसद-माहूर रोडवरील इंदिरानगर येथील डंपिंग ग्राउंडजवळ आज सोमवारी सकाळी ही घटना घडली.

पुसद तालुक्यातील काटखेडा येथील गणेश विष्णू जाधव (वय 29) व महागाव तालुक्यातील कोठारी येथील अरविंद प्रल्हाद राठोड (वय 35) अशी मृतकांची नावे असून अनिता अरविंद राठोड ही महिला जखमी झाली आहे. सोमवारी सकाळी दोन दुचाकी इंदिरानगरमार्गे पुसदकडे येत होत्या. त्याचवेळी एमएच 21 बीएच 3760 क्रमांकाचे मालवाहू वाहन त्याच दिशेने पुसदकडे येत होते. इंदिरानगर जवळील डंपिंग ग्राउंडजवळ या मालवाहू टिप्परने दोन्ही दुचाकीला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. विष्णू जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद पोलिसांनी वाहनचालकाविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news