Yavatmal Accident : भरधाव कार उभ्या ट्रकवर आदळली; चालक ठार, 3 जण जखमी

Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

यवतमाळ : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव वेगात असलेली कार आदळली. या भीषण अपघातात कारचालक जागीच ठार झाला तर चिमुकलीसह तिघे गंभीर जखमी झाले. कळंब तालुक्यातील बेलोना शिवारात मंगळवारी रात्री ११ वाजताचे सुमारास ही घटना घडली.

मंथन हिरामण नंदेश्वर (वय २७) असे मृत चालकाचे नाव असून रोशन नाईक त्याची पत्नी पायल व सात वर्षीय चिमुकली गाथा हे तिघे गंभीर जखमी झाले. नागपूर जिल्ह्यातील वाणाडोंगरी येथील मंथन नंदेश्वर हा नागपूर येथे शिक्षण घेत आहे. मंगळवारी रात्री ७ वाजताचे सुमारास मंथन हा यवतमाळ येथील त्याचा मित्र रोशन नाईक, त्याची पत्नी पायल व मुलगी गाथा या सर्वांना यवतमाळ येथे सोडण्यासाठी मित्राच्या कारने वानाडोंगरी येथून यवतमाळकडे निघाले.

रात्री ११ वाजताचे सुमारास कळंब तालुक्यातील बेलोना गावाजवळ येताच रस्त्यात उभा असलेल्या एमएच २६बीइ ८६४९ क्रमांकाच्या ट्रकला मागाहून जबर धडक दिली. त्यात चालक मंथनचा जागीच मृत्यू झाला तर रोशन नाईक त्याची पत्नी पायल व मुलगी गाथा हे तिघेही जखमी झाले. तिघांनाही यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केल्यामुळे अपघात झाल्याची तक्रार मृतकाचे वडील हिरामण नागोबाजी नंदेश्वर (वय ६०) यांनी आज बुधवारी कळंब पोलिसात दाखल केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news