Yavtmal Accident : आजोबांच्या भेटण्यासाठी धावलेल्या 5 वर्षीय नातवाचा बसच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू

बाभूळगाव तालुक्यातील पालोती बसस्थानकावर घडली घटना
Yavtmal Accident
Yavtmal Accident
Published on
Updated on

यवतमाळ :  शाळेला सुट्ट्या लागल्याने आजोबाच्या भेटीसाठी आपल्या आईसह निघालेल्या नातवाचा बसच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. बाभूळगाव तालुक्यातील पालोती बसस्थानकावर शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या तर रस्ता रोखून धरला. 

घाटंजी येथील रहिवासी साहिल प्रमोद येंबडवार (वय पाच) असे मृत नातवाचे नाव आहे. शाळेला सुट्ट्या लागल्याने तो आई आचल (वय 26) सोबत घाटंजीवरून शुक्रवारी आजोबाच्या गावी बाभूळगाव तालुक्यातील पालोती येथे निघाला होता. एमएच 49 बीझेड 7936 क्रमांकाच्या ईलेक्ट्रीक बसने प्रवास करताना पालोती गावी पोहोचला. यावेळी तो आईसोबत बसखाली उतरला आणि आजोबाच्या भेटीसाठी धावला त्याचक्षणी बस पुढे निघाली असता तो समोरच्या चाकाखाली सापडून जागीच गतप्राण झाला.

या हृदयद्रावक घटनेमुळे संतप्त जमावाने एसटी बसच्या काचा फोडल्या. प्रसंगावधान राखून सर्व प्रवासी बसमधून उतरले. प्रवाशांनी चालक व वाहकाला आपल्या आपल्या सोबत घेतले यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, पोलिस निरीक्षक दीपमाला भेंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस उपनिरीक्षक दीपक आसकर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. संतप्त जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. एसटीचे नुकसान होऊ नये म्हणून अपघातग्रस्त बस वीरखेड, वाटखेड, नायगाव, मिटनापूर मार्गे पोलिस स्टेशनला आणून उभी करण्यात आली. पोलिसांनी बसचालकाविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news