Yavatmal Accident : हिवरा येथे काळाचा घाला : बहिणीला परीक्षेला नेणाऱ्या भावाचा अपघातात करुण अंत

जनावरे वाहून नेणाऱ्या भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले, चालक फरार; बहिणीची प्रकृती चिंताजनक
Accident
Accident Pudhari
Published on
Updated on

यवतमाळ : बहिणीचे भविष्य घडवण्यासाठी तिला परीक्षेला घेऊन जाणाऱ्या भावावर काळाने झडप घातली आहे. जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहीण मृत्यूशी झुंज देत आहे. हा हृदयद्रावक अपघात बुधवारी सकाळी साडेआठ वाजता महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) परिसरात घडला.

नेमकी घटना काय?

पुसद येथील लक्ष्मीनगरचा रहिवासी असलेला बुद्धभूषण राजू भालेराव (वय २४) हा तरुण आपली बहीण विशाखा (२१) हिला दुचाकीवरून (MH 29 CE 3312) माहूर येथे परीक्षेसाठी घेऊन जात होता. हिवरा (संगम) येथील मुस्लिम कब्रस्तानजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या एका अनियंत्रित वाहनाने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, बुद्धभूषणचा जागीच मृत्यू झाला.

चालक फरार, बहिणीची प्रकृती चिंताजनक

अपघात घडल्यानंतर मानवता दाखवण्याऐवजी वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या विशाखाला स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. अपघाताची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

पोलिसांकडून मारेकरी वाहनाचा शोध सुरू

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. फरार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आरोपीच्या मागावर असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news