Yavatmal accident news | मोकाट बैलाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

या घटनेमुळे रस्त्यावरील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
Yavatmal accident news
Yavatmal accident news
Published on
Updated on

यवतमाळ : मोकाट धावत असलेल्या बैलाची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंप्री-डिवळणी मार्गावर ही घटना शनिवारी (ता. ७) सकाळी १०:३० वाजता घडली. या घटनेमुळे मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

शेंबाळपिंप्री येथील रमेश शंकर कौटीकवार (वय ५८) असे मृताचे नाव आहे. ते कामानिमित्त एम. एच. २९ पीएन १४८० क्रमांकाच्या दुचाकीने शेंबाळपिंप्री येथून पुसदकडे येत होते. डिवळणी गावाजवळ येताच अचानक बैलाने धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते कोसळले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्यांना पुसद येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेमुळे शेंबाळपिंप्री परिसरात शोककळा पसरली आहे. रमेश कौटीकवार यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले व नातवंडे असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news