येळाबारा धबधब्यात दोन तरुण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला

Yavatmal news | वडगाव जंगल पोलिसांकडून शोध सुरू
Yavatmal Yelabara waterfall deaths
येळाबारा धबधबा परिसरात दोन युवक बुडाले.File Photo
Published on
Updated on

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : वाघाडी प्रकल्पातील वाघाडी सांडव्यामुळे येळाबारा येथे धबधबा तयार झाला आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येत नागरिक भेट देत आहेत. अनेकजण मौजमस्ती करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. यातून गंभीर घटना घडत आहेत. येळाबारा धबधबा परिसरात दोन युवक बुडाले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. यातील एका युवकाचा मृतदेह रविवारी दुपारी हाती लागला. दुसऱ्याचा अजूनही शोध सुरू आहे.

देवराज संतोष गेडाम (वय १७, रा. घाटी, घाटंजी) असे मृत युवकाचे नाव आहे. तो त्याच्या मित्रासह शनिवारी येळाबारा धबधबा परिसरात आला होता. त्यांनी काही वेळ धबधब्याच्या धारेत आनंद लुटल्यानंतर ते दोघे खाली डोहात उरतले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले. याची माहिती तिथे उपस्थित नागरिकांनी पोलिसांना दिली. वडगाव जंगल पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने बुडालेल्या युवकांचा शोध सुरू केला. शनिवारी त्यांना यश आले नाही. रविवारी काही घटना स्थळापासून काही मीटर अंतरावर युवकाचा मृतदेह हाती लागला. दुसऱ्या युवकाच्या मृतदेहाचा अजूनही शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिस जमादार धनंजय शेकदार यांनी दिली.

Yavatmal Yelabara waterfall deaths
यवतमाळ : बाबाजी दाते बँकेत २४२ कोटींचा अपहार; २०६ जणांवर गुन्हे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news