फोनवरुन वन अधिकाऱ्याला साडेतेरा लाखांचा गंडा

फोनवरुन वन अधिकाऱ्याला साडेतेरा लाखांचा गंडा

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : दारव्हा येथे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून भरघोस परतावा देतो, असे म्हणत एका अज्ञान व्यक्तीने वन अधिकाऱ्याला 13 लाख 55 हजारांचा गंडा घातला. शहरातील गोळीबार चौकात हा प्रकार घडला. शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळेल, असे सांगत वनअधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास मदनय्या कटकू यांना एका मोबाईलवरून कॉल आला. संबंधिताने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत चांगला परतावा मिळविण्याच्या टिप्स् दिल्या जातील असे सांगितले. यासाठी एका ग्रुपमध्येही कटकू यांना सामील देखील केले होते. त्यानंतर एक लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगितले. सोबतच कटकू यांचे बँक खाते, आधार कार्ड याचीही माहिती घेतली. यानंतर आरोपीने तब्बल 13 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दारव्हा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news