Yavatmal Crime | दुचाकी चोरीप्रकरणाचा छडा; अल्पवयीन मुलाकडून घेतली ताब्यात

इंझापूर येथील दुचाकी यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे सापडली
Crime
CrimeFile Photo
Published on
Updated on

Stolen motorcycle recovered Wani Yavatmal

वर्धा : मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावत मोटारसायकल जप्त करण्यात आली. सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. इंझापूर येथील व्यक्तींची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार केली होती.

तपासादरम्यान यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे एक जण चोरी झालेली मोटारसायकल फिरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी वणी गाठून दुचाकीचा शोध घेतला. एक अल्पवयीन मुलगा वणी रोडवर चोरी गेलेली मोटरसायकल घेवून मिळून आला. चौकशीदरम्यान मोटरसायकल चोरीची असल्याची खात्री झाली. त्याच्या ताब्यातून मोटारसायकल जप्त करण्यात आली.

Crime
Yavatmal Crime News | नवजात बाळाला फेकणाऱ्या माता-पित्यास अटक

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news