Money Theft Case | भरदिवसा पोस्टमनला लूटले; ७ लाख घेवून अज्ञात पसार

करळगाव घाटातील घटना
Theft News |
Money Theft Case | भरदिवसा पोस्टमनला लूटले; ७ लाख घेवून अज्ञात पसारFile Photo
Published on
Updated on

यवतमाळ : येथील मुख्य डाक घरातून सात लाख रुपये घेवून दुचाकीने जाणा-या पोस्टमनला दोघांनी वाटेतच अडविले. चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. यानंतर दुचाकी व रोख रक्कम घेवून पसार झाले. ही घटना आज मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास करळगाव घाटात घडली.

सुभाष नारायण बारशे (वय ५९ रा. यवतमाळ) असे पोस्ट मास्तरचे नाव असून ते बाभुळगाव येथील पोस्ट ऑफीसमध्ये कार्यरत आहे. ग्रामीण भागातील पोस्ट ऑफीसमध्ये देण्यासाठी त्यांनी यवतमाळ येथील पोस्ट ऑफीसमधून सात लाख रुपये काढले. सदर रक्कम मोपेड वाहनाच्या डीक्कीत ठेवुन ते बाभुळगावकडे जात होते. दरम्यान, यवतमाळ धामणगाव मार्गावरील करळगाव घाटाजवळ पाठीमागुन दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची गाडी अडविली.

गाडीची चावी मागितली असता बारशे यांनी नकार दिला. त्यामुळे चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवित मारहाण केली. यानंतर वाहन व रोख रक्कम घेवून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी सिसिटीव्ही फुटेज तपासले.वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news