Yavatmal crime: छेडछाडीला मुलींचे प्रत्युत्तर; रोडरोमियोला बाजारपेठेत चोप

नेर शहरातील मुख्य बाजारपेठेत शनिवारी (ता. १८) सायंकाळी छेडछाडीची घटना घडली
crime news
crime newsPudhari
Published on
Updated on

यवतमाळ : नेर शहरातील मुख्य बाजारपेठेत शनिवारी (ता. १८) सायंकाळी छेडछाडीची घटना घडली. एका युवकाने दोन मुलींना छेडण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या मुलींनी त्याला भर बाजारातच चांगलाच धडा शिकवला. या वेळी उपस्थित नागरिकांनीही त्या युवकाला चोप दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, एक युवती व दोन अल्पवयीन मुली जुन्या सत्यनारायण टॉकीजजवळील बाजारपेठेत खरेदीसाठी आल्या होत्या. यावेळी एका तरुणाने त्यांची छेड काढली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या युवतीने त्या तरुणाला रस्त्यातच चपलेने मारहाण केली. तिच्यासोबत असलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींनीही त्याला चांगलाच धोपटला.

घटना घडताच परिसरात मोठी गर्दी जमली. त्यानंतर काही नागरिकांनीही संबंधित युवकाला मारहाण केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी त्या युवकाला ताब्यात घेतले. मुलींनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा प्रकारांना कठोर प्रत्युत्तर मिळाल्यास भविष्यात छेडछाडीच्या घटना रोखण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नेर पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news