पाच हजार रुपयाची लाच घेताना वीज अभियंत्यास अटक

Bribery Case: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई
Yavatmal Bribe News
पाच हजार रुपयाची लाच घेताना वीज अभियंत्यास अटकFile Photo
Published on
Updated on

यवतमाळ : वीज मिटर बसविण्यासाठी शासकीय शुल्का व्यतिरिक्त पाच हजार रुपयाची लाच मागणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यास रंगेहात अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (गुरुवारी) ३० जानेवारीला राळेगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात केली.

जगदीश श्रीराम ढुमणे (वय ४५)  असे अटक केलेल्या वीज अभियंत्यांचे नाव आहे. ते राळेगाव येथे सहाय्यक अभियंता, वर्ग २ पदावर कार्यरत होते. तक्रारदाराने घरात वीज मीटर बसविण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, शासकीय शुल्क व्यतिरिक्त पाच हजार रुपयाची मागणी जगदीश ढुमणे यांनी केली. याविरोधात तक्रारदाराने २९ जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्यावरुन एसीबीच्या पथकाने ३० जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. ढुमणे यांनी शासकीय शुल्क व्यतिरिक्त स्वतः करीता ५ हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून सापळा रचला आणि सहायक अभियंत्यास रंगेहात पकडले.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत राळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक, मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचीद्र शिंदे, यवतमाळचे पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस अंमलदार पोहवा अतुल मते, अब्दुल वसीम, सचीन भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, गोवर्धन वाढई व  संजय कांबळे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news