Umarkhed Teacher Accident Death | शिक्षिकेच्या अपघाती मृत्यूप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध पोफाळी पोलिसांत गुन्हा दाखल

उमरखेड-कुपटी मार्गावर डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या शिक्षिकेचा मृत्यू
Umarkhed Pusad Road Accident
प्रज्ञा गजानन चव्हाणPudhari
Published on: 
Updated on: 

Teacher Accidental Death Umarkhed

उमरखेड : उमरखेड-कुपटी मार्गावरील कृषी महाविद्यालयाजवळ डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या शिक्षिका प्रज्ञा गजानन चव्हाण (वय ४५, रा. व्यंकटेश नगर, उमरखेड) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डंपरचालकाविरुद्ध पोफाळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ७ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. प्रज्ञा चव्हाण या नेहमीप्रमाणे आपल्या स्कुटीने (एमएच २९ व्ही ७३८२) कुपटी येथील स्व. दादाराव पाटील मोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. कृषी महाविद्यालयाजवळ पोहोचल्या असता समोरून येणाऱ्या हायवा डंपरने (एमएच २६ सीएच १३६७) त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

Umarkhed Pusad Road Accident
Nanded Accident | उमरखेड-पुसद मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील शिक्षिकेचा मृत्यू

अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून निघून गेला. स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने जखमी प्रज्ञा चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील गंगा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी प्रज्ञा चव्हाण यांचे पती गजानन धोंडबाराव चव्हाण (वय ४८, रा. पोफाळी, ता. उमरखेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोफाळी पोलिसांनी हायवा डंपरचालकाविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या तसेच मोटार वाहन कायद्याच्या अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोफाळी पोलीस ठाण्याचे पीएसआय शिंदे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news