यवतमाळ : धारदार शस्रासह डोक्यात दगड घालून तरूणाची निर्घृण हत्या

वाघापूर टेकडी येथील घटना
Yavatmal Crime News
धारदार शस्रासह डोक्यात दगड घालून तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली.File Photo
Published on
Updated on

यवतमाळ : धारदार शस्त्र आणि डोक्यात दगड घालून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या वाघापूर टेकडी येथील काशीनाथ महाराज मठाजवळ सोमवारी (दि.१७) पहाटे ही घटना उघडकीस आली. हत्येचा हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

आशिष माणिकराव सोनोने (वय ३४, रा. यवतमाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. शहरालगत असलेल्या बोदड येथील प्रिया रेसीडेन्सी परिसरात आशिष हा कुटुंबियांसह राहत होता. आशिषला दारूचे व्यसन असल्याने वर्षभरापासून त्याची पत्नी वेगळी राहत होती. दरम्यान आशिष हा वाघापूर टेकडी येथील काशीनाथ महाराज मठाजवळ असलेला मित्र मनवर याच्याकडे अधूनमधून राहत होता. अशात सोमवारी मध्यरात्री अनोळखी तरूणांनी त्याला घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करीत डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. या प्रकरणी सुनिता माणिकराव सोनोने (वय ५४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पोलिस करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news