राजू रामचंद्र राठोड (५२, रा. रुद्राक्ष कॉलनी, जांब रोड) असे गुन्हे दाखल झालेल्या वसतिगृह गृहप्रमुखाचे नाव आहे. त्याने २८ जानेवारी २०२२ ते १ ऑगस्ट २०२३ पर्यंत बनावट देयकें सादर करून रोख रक्कम उचलल्याचे चौकशीत पुढे आले आहे. ही रक्कम उचलण्यासाठी राजू राठोडने आपल्या पदाचा गैरवापर करीत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील प्रकल्प अधिकाऱ्यांचा उ बनावट शिक्का व स्वाक्षरी तयार केली. त्याचे देयक कोषागारात सादर करून वेळोवेळी रकमेची उचल केली. लेखा विभागाच्या पडताळणीमध्ये या देयकांचा संदर्भ लागला नाही. त्यामुळे सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत ही देयके गृहप्रमुख राजू राठोड याने कोषागार विभागात सादर केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पुन्हा या देयकांची पडताळणी केली. त्यामध्ये देयकावरील शिक्का व सही बनावट असल्याचे पुढे आले. एकूणच अपहाराचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर गृहपाल सचिन भगतराव जानकर (रा. रंभाजीनगर) यांनी लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.