यवतमाळमध्ये बनावट सही व शिक्का वापरून २० लाखांचा अपहार

यवतमाळमध्ये बनावट सही व शिक्का वापरून २० लाखांचा अपहार
Published on
Updated on
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील शासकीय मुलांच्या वसतिगृहात कार्यरत असलेल्या गृहप्रमुखाने अजब कारनामा केला. थेट प्रकल्प अधिकाऱ्याच्या सही-शिक्क्याचा वापर करीत कोषागार विभागातून देयके काढून घेतली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ही अपहाराची रक्कम १९ लाख ७६ हजार ९७६ रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू रामचंद्र राठोड (५२, रा. रुद्राक्ष कॉलनी, जांब रोड) असे गुन्हे दाखल झालेल्या वसतिगृह गृहप्रमुखाचे नाव आहे. त्याने २८ जानेवारी २०२२ ते १ ऑगस्ट २०२३ पर्यंत बनावट देयकें सादर करून रोख रक्कम उचलल्याचे चौकशीत पुढे आले आहे. ही रक्कम उचलण्यासाठी राजू राठोडने आपल्या पदाचा गैरवापर करीत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील प्रकल्प अधिकाऱ्यांचा उ बनावट शिक्का व स्वाक्षरी तयार केली. त्याचे देयक कोषागारात सादर करून वेळोवेळी रकमेची उचल केली. लेखा विभागाच्या पडताळणीमध्ये या देयकांचा संदर्भ लागला नाही. त्यामुळे सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत ही देयके गृहप्रमुख राजू राठोड याने कोषागार विभागात सादर केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पुन्हा या देयकांची पडताळणी केली. त्यामध्ये देयकावरील शिक्का व सही बनावट असल्याचे पुढे आले. एकूणच अपहाराचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर गृहपाल सचिन भगतराव जानकर (रा. रंभाजीनगर) यांनी लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news