आम्ही कुणाचे घर फोडले नाही : चंद्रशेखर बावनकुळे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आम्ही कोणाचे घर फोडलेले नाही. भाजपचे संस्कार कोणाचे घर फोडण्याचा नाही. विधानसभा, लोकसभा एकत्र लढणार असल्याचे कालच अजित पवारांनी सांगितले आहे. आज महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात चांगले सरकार बनले आहे, हिंदुत्व करता शिंदे यांनी लढाई केली. अजित पवारांसारखा एक नेता आणि देवेंद्र फडणवीसांसारखा एक नेता सरकारमध्ये आहे. राज्यातले हे सर्वात चांगले मंत्रिमंडळ असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. व्यक्तीचे महत्त्व कमी होत नाही, त्यामुळे असा आक्षेप घेणे अशा पद्धतीच्या संभ्रम तयार करणे हे योग्य नाही असेही बावनकुळे म्हणाले. राजकारणात विकास दडलेला असतो. केवळ मंत्रिपदासाठी कोणीही आलेलं नाही. देशहित आणि राष्ट्रहित महत्त्वाचे आहे. त्यामुळे एखादे मंत्रीपद मिळालं की नाही याकरिता भाजप कार्यकर्ते, आमदार काम करत नाहीत हे त्या ठिकाणी मनात आणणार नाही आमचे सर्व आमदार जोमाने काम करतात.

आज सगळे एकत्रित काम करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ठरवतील त्यानुसारच होईल. खातेवाटपाबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. २०१९ मध्ये फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून सुरुवात त्यांनी केली. आज ते म्हणतात की, आम्ही रस्त्यावर उतरू, आज भावनात्मक बोलतात. त्या दिवशी काय होतं तर ? मग ज्या दिवशी महाराष्ट्रातील जनतेने फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती याकडे लक्ष वेधले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news