वाशिम : बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

वाशिम : बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Published on: 
Updated on: 

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : नागपूर – औरंगाबाद हायवेलगत असलेल्या शेतशिवारात इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (suicide)  केली. ही घटना आज (शनिवार) सकाळी उघडकीस आली. शंकर प्रल्हाद पांडव (वय १८, रा. जऊळका रेल्वे, ता. मालेगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी दिलीप तुकाराम पांडव (वय ४७) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पुतण्या शंकर पांडव याने शेतातील विहिरीजवळ झोपडीच्या बाजूला मोहाच्या झाडावरून झोपडीवर टाकलेल्या लाकडी दांडीला पांढऱ्या नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास ठाणेदार आजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सचिन कल्ले व पोलीस सुनील काळदाते हे करीत आहेत .

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news