विदर्भ : चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून ३ ठार, २ जखमी

वीज
वीज
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी (१० सप्टेंबर) दुपारपासून तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून 3 जण ठार तर 2 महिला जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये एक महिला गंभीर जखमी आहे. पहिली घटना ब्रह्मपुरी तालुक्यात आवळगाव शेतशिवारात घडली. यामध्ये १ महिला जागीच मरण पावली तर १ महिला गंभीर जखमी झाली. दुसरी घटना सावली तालुक्यात घडली असून चकपिरंजी शेत शिवारात एका महिलेचा मृत्यू झाला. गेवरा खुर्द शिवारात एक शेतकरी ठार झाला आणि एक महिला जखमी झाली आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे धान पीक निंदणाचे काम सुरू आहे. आज रविवारी आवळगाव येथील नथुजी नरुले यांच्या शेतावर शामला लोळे व ज्योती पोहनकर यासह पाच ते सात महिला कामाकरिता गेल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला जोरदार सुरुवात झाली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास काम झाल्यानंतर शेतातील बांधावरील झाडाखाली महिला जेवण करायला बसल्या होत्या. याचदरम्यान विजांचा कडकडाट होवून वीज कोसळली. या दुर्घटनेत श्यामला लोळे (वय 50) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर ज्योती पोहनकर ( वय 24) ही महिला गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी महिलेला आरमोरी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे.

दूसरी घटना सावली तालुक्यातील चकपिरंजी शिवारात सायंकाळी घडली. येथीलच मंगला सुधाकर येल्लटीवार (वय 55) ही महिला स्वतःच्या शेतात निंदणाचे काम करीत असताना विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. यामध्ये या महिलेच्या अंगावर वीज पडून ती शेतात जागीच ठार झाली. शेतातून पत्नी अजून घरी परत येण्यास विलंब झाल्याने पती सुधाकर हा शेतात पाहण्यासाठी गेला असता ती शेतात पडून दिसली . सावली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी येवून पंचनामा केला.

तिसरी घटनाही याच तालुक्यातील गेवरा खुर्द शेत शिवारात घडली. आज दुपारपासून जोरदार पाऊस सूरूवात झाला. शेतकरी शरद पंढरी मुनघाटे (वय 50) हे शेतात निंदणाचे काम करीत असताना दुपारी 3 च्या सुमारास जोरदार विजेचा कडकडाट झाला. आणि त्यावेळी शेतक-यावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सोबत काम करण्याऱ्या 5 ते 6 महिले पैकी एक महिला ही जखमी झाली. मृतकाचे पश्चात 3 मुली असुन घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news